गझल हा मुळात उर्दू भाषेतील काव्यप्रकार मराठीत आला, रूजला, फुलला, बहरला आणि रसिकांनी उचलून धरला. मराठी गजलेला लोकमान्यता मिळवून देण्याचं श्रेय कविवर्य सुरेश भट यांच्याकडे जाते. त्यांचीच प्रेरणा घेऊन कांचन ओझे यांनी लिहिलेल्या काही मराठी गझला.

गावामध्ये हिंडून थोडी दु:खे आणतो उधार,
त्या दु:खांच्या दगडांवर शब्दांना करतो धार,
त्या शब्दांच्या रचना करुनी ओळी लिहितो चार,
ऐकून मित्र म्हणतात, "क्या गझल लिखी है यार!"

या गझलेला चाल लावून गायली आहे मुग्धा पेंढारकर यांनी.

प्रवास ही गझल श्री. रविन ओझे यांनीही वेगळी चाल लावून गायली आहे.


कोडे

स्फुरली गझल मनी ही, कुणा ऐकवु कशाला,
शांत झालेली ती चर्चा, पुन्हा वाढवू कशाला. ||ध्रुव ||

भरून आल्या जखमा, या काळजाच्या साऱ्या,
उरलेले हे वण कुणाला दाखवू कशाला, ||१||

केली होती कसरत किती, जपण्यासाठी नाती,
त्या नात्यांचा झाला गुंता, सोडवू कशाला. ||२||

रक्त आटवले ज्यांच्या साठी, ते ही सोडून जाती,
जाणाऱ्याना भले जाऊदे, आडवू कशाला. ||३||

कधी हारलो, कधी जिंकलो खेळ आयुष्याचा,
जीवन आता बनले कोडे, सोडवू कशाला ||४||

कांचन ओझे यांनी लिहिलेल्या ह्या गझलेला संगीत देऊन गायली आहे सौ. मुग्धा पेंढारकर यांनी,




	

Leave a comment

3 responses to “मराठी गझला”

  1. mindsocketsblog avatar

    तुमच्या वेबसाइटवरून मराठी गझला वाचून खूप आनंद झाला. गझलांचे शब्द आणि भावना अगदी मनाला भिडणारे आहेत. तुमच्या कामासाठी आभार आणि पुढील गझलांसाठी शुभेच्छा!

    Liked by 1 person

    1. KANCHAN OZE avatar

      मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या अभिप्रायामुळे अजून काही लिखाण करण्यास स्फुरण मिळेल.

      Like

    2. KANCHAN OZE avatar

      धन्यवाद!🙏

      Like