दुःखे सुद्धा ऐसी, तू का देसी अनंता,
ना सहन होती सहजी, ना येती सांगता. ॥धृ॥
स्मितरेषा चेहऱ्यावरची ढळली ना कधीही,
घाव झेलले काळजावरी, रोज येता जाता. ॥१॥
कायेवरच्या जखमा येती भरूनी कालांतरे,
जखमा काळजाच्या देती, फक्त अगतिकता. ॥२॥
दान दिले जे विधात्याने, हसतच स्वीकारले
या जखमांवर मलम कधी तो देईल का दाता? ॥३॥
वाटते आता भिजत रहावे, सदा पावसा मधे,
जगापासूनी अशीच येतील आसवे लपविता. ॥४॥
कृपया आपला आभिप्राय नोंदवा.
Leave a comment