निवृत्तीचा काळ सुखाचा,
सहवास असे जर नातवंडांचा.
आगमन बाळराजाचे.
पुष्प तोरणे लावा, सजवा रांगोळ्या दारी
बाळराजा आला माझ्या कन्येच्या घरी ॥धृ॥
दोन चिमुकले हात आणखी इवली इवली बोटे
पाहताच ते रूप गोजिरे, उचलून घ्यावे वाटे
झुरते मन हे पाहून त्याला केवळ पडद्यावरी
बाळराजा आला माझ्या कन्येच्या घरी. ॥१॥
नाजूक नाजूक ओठ आणखी गाल किती गोबरे
टकमक टकमक हलणारे ते डोळे, टपोरे
हातामध्ये हात गुंफुनी ऐटीत बसते स्वारी
बाळराजा आला माझ्या कन्येच्या घरी. ॥२॥
विसावे पहा शांतपणाने कुशीत मातेच्या
पारावारच नाही आहे खुशीस हो त्यांच्या
त्यांच्या वरूनी ओवाळूया इथून मीठ मोहरी
बाळराजा आला माझ्या कन्येच्या घरी. ॥३॥
घरामधे तू फुलविलास रे बाळा वसंत,
आशिर्वाद हा तुला राजसा, होई औक्षवंत
ऱिद्धी सिद्धीचा वास असावा सदैव तुमच्या दारी,
बाळराजा आला माझ्या कन्येच्या घरी. ॥४॥
नंदाघरचा कृष्ण.
रूप गोजिरे तुझे लावीते जगास साऱ्या लळा,
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥धृ ॥
गोड तुझे ते बोल बोबडे
गाल गोबरे, ओठ तांबडे,
पाहिल त्याला मोहुन टाकी, मुखडा तव कोवळा,
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥१॥
असुनी खेळणी इतुकी सारी,
मोरपीस तुज प्रिय भारी,
आला कोठुन तुझीया अंगी, छंद हा आगळा?
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥२॥
घेऊन हाती दुपटे मऊसर,
लुटुलुटु, लुटुलुटु चालशी घरभर,
कानी पडते रुणझुण कोठुन, नसून पायी वाळा?
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥३॥
नाही मुरली तुझीया हाती,
सूर कसे मम कानी पडती?
उगाच वाटे चोरून नेशिल लोण्याचा गोळा,
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥४॥
बाळकृष्ण हा भासे मजला,
आमच्या संगे असेल रमला,
जीव लावुनी आम्हाला, जो विसरला गोकुळा,
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥५॥
कृष्णासम तू होई ज्ञानी,
श्रीरामासम एकवचनी,
दिगंत व्हावी साऱ्या जगती, कीर्ती तव बाळा,
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥६॥
नंदाघरचा कृष्ण.
रूप गोजिरे तुझे लावीते जगास साऱ्या लळा,
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥धृ ॥
गोड तुझे ते बोल बोबडे
गाल गोबरे, ओठ तांबडे,
पाहिल त्याला मोहुन टाकी, मुखडा तव कोवळा,
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥१॥
असुनी खेळणी इतुकी सारी,
मोरपीस तुज प्रिय भारी,
आला कोठुन तुझीया अंगी, छंद हा आगळा?
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥२॥
घेऊन हाती दुपटे मऊसर,
लुटुलुटु, लुटुलुटु चालशी घरभर,
कानी पडते रुणझुण कोठुन, नसून पायी वाळा?
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥३॥
नाही मुरली तुझीया हाती,
सूर कसे मम कानी पडती?
उगाच वाटे चोरून नेशिल लोण्याचा गोळा,
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥४॥
बाळकृष्ण हा भासे मजला,
आमच्या संगे असेल रमला,
जीव लावुनी आम्हाला, जो विसरला गोकुळा,
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥५॥
कृष्णासम तू होई ज्ञानी,
श्रीरामासम एकवचनी,
दिगंत व्हावी साऱ्या जगती, कीर्ती तव बाळा,
नंदाघरचा कृष्ण नसावा तुझ्याहून वेगळा. ॥६॥
तुज कृष्ण कसा मी म्हणू?
रूप पाहता तुझे गोजिरे,
मनात वाजे वेणू,
गोरा किती रे वर्ण तुझा,
तुज कृष्ण कसा मी म्हणू? ।धृ।
सुरेख हा मुखचंद्र घेऊनी,
आला अवनीवरी,
पाहुन तुजला मोहुन गेली,
दुनिया ही सारी.
डाग न एकही कांतीवर,
तुज चंद्र कसा मी म्हणू?
गोरा किती रे वर्ण तुझा,
तुज कृष्ण कसा मी म्हणू? ।१।
आगमनाने तुझिया,
आला मोद या जीवनी,
घेऊनी आला शत सूर्यांचे
तेज दोनही नयनी.
शीतल भासे स्पर्श तुझा,
तुज सूर्य कसा मी म्हणू?
गोरा किती रे वर्ण तुझा,
तुज कृष्ण कसा मी म्हणू ।२।
हासुनी बघता तू
भासशी तेजस्वी तारा,
तव हास्याने उजळून जाई
कोपरा कोपरा.
तेज ढळे ना दिवसाही,
तुज शुक्र कसा मी म्हणू?
गोरा किती रे वर्ण तुझा,
तुज कृष्ण कसा मी म्हणू? ।३।
हृदयी उसळे वात्सल्याचा
तुझ्या मुळे सागर
जवळी घेण्या तुजला माझे
मन असते आतूर
गोड तू मधुघटाहून
तुज सागर का मी म्हणू?
गोरा किती रे वर्ण तुझा
तुज कृष्ण कसा मी म्हणू? ।४।
नात्याने मी आजोबा
आणिक तू माझा नातू
ध्यानी, मनी, स्वप्नी,
आणिक हृदयामध्ये तू
आयुष्य लाभो माझे तुजला
अजून काय मी म्हणू?
गोरा किती रे वर्ण तुझा
तुज कृष्ण कसा मी म्हणू? ।५।
मिठी नातवाची.
जप केले, ध्यान लावले, केले होम हवन,
उपवास केले, पूजा केल्या, केले तीर्थाटन.
तरीही ना लाभली शांती, स्थिर न झाले मन,
मिठी मारता नातवाला, वाटे झालो पावन! ॥१॥
ग्रीष्म ऋतूचा दाह असो की, पानगळ शिशिराची,
मळभ असो आकाशी, अथवा रात असो अवसेची.
घरात येता नातू येई, वसंतात श्रावण,
मीठी मारता नातवाला, वाटे झालो पावन! ॥२॥
कधी कधी दाटते उदासी, मन सैरभैर होई,
चित्त न लागे कशातही, अन् वैर जगाशी होई,
फोन वाजता पळे उदासी, 'हॅलो आबा' ऐकून,
मीठी मारता नातवाला, वाटे झालो पावन! ॥३॥
शब्द ऐकता त्याचे, भासे दुधामधे मध,
सहवास त्याचा असे, सार्या रोगांवर औषध,
अस्तित्वाने त्याच्या झाले सुंदर हे जीवन,
मीठी मारता नातवाला, वाटे झालो पावन. ॥४॥